जलद क्षयरोग निदानासाठी महाराष्ट्र 'नाट'चा विस्तार करणार

महाराष्ट्राचा आरोग्य विभाग क्षयरोगाच्या (टीबी) जलद आणि अधिक अचूक निदानासाठी ‘न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लीफिकेशन टेस्ट’ (NAAT, नाट) चा वापर वाढवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जिथे अजूनही पारंपरिक सूक्ष्मदर्शक चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
जलद क्षयरोग निदानासाठी  महाराष्ट्र 'नाट'चा विस्तार करणार
जलद क्षयरोग निदानासाठी महाराष्ट्र 'नाट'चा विस्तार करणार'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : महाराष्ट्राचा आरोग्य विभाग क्षयरोगाच्या (टीबी) जलद आणि अधिक अचूक निदानासाठी ‘न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लीफिकेशन टेस्ट’ (NAAT, नाट) चा वापर वाढवण्याच्या तयारीत आहे. विशेषतः ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जिथे अजूनही पारंपरिक सूक्ष्मदर्शक चाचण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२४ ते ४ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘टीबीमुक्त भारत अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्रात ३९.२१ लाख टीबी चाचण्या घेतल्या. यापैकी २१.४८ लाख म्हणजेच ५५% चाचण्या ‘नाट’द्वारे करण्यात आल्या. ‘नाट’ हे एक आण्विक निदान तंत्रज्ञान आहे. जे टीबीचे जिवाणू शोधते आणि विशिष्ट चाचण्यांमध्ये औषधांना असणारा प्रतिकार देखील ओळखू शकते.

‘नाट’ ही आधुनिक प्रयोगशाळा चाचणी आहे, ज्याद्वारे रुग्णाच्या नमुन्यातील जनुकीय द्रव्य ओळखून टीबी जिवाणूंचा शोध घेतला जातो.

ग्रामीण भागात झालेल्या २८ लाख चाचण्यांपैकी केवळ ४७% चाचण्या या ‘नाट’द्वारे झाल्या, तर १४.८४ लाख चाचण्या पारंपरिक मायक्रोस्कोपीद्वारे करण्यात आल्या.

काही जिल्ह्यांमध्ये ‘नाट’ची उपलब्धता खूपच कमी आहे. सोलापूरमध्ये टीबीच्या केवळ २५% चाचण्या आधुनिक पद्धतीने झाल्या, तर वाशीम आणि बीडमध्ये हे प्रमाण २९% होते. परिणामी, या जिल्ह्यांतील ७०% पेक्षा जास्त रुग्ण अजूनही पारंपरिक मायक्रोस्कोपीवरच अवलंबून आहेत.

याउलट, मुंबईतील क्षयरोगाच्या जवळपास ८८% चाचण्या ‘नाट’द्वारे करण्यात आल्या, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील आधुनिक निदान सुविधांच्या उपलब्धतेतील मोठा फरक अधोरेखित होतो.

टीबीसाठी अचूक निदान आवश्यक

टीबी नियंत्रणासाठी लवकरात लवकर आणि अचूक निदान होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण संसर्गजन्य रुग्ण इतरांनाही आजार पसरवू शकतात. ‘नाट’च्या वापरामुळे संशयित रुग्णांचे निदान वेगाने होण्यास मदत होऊ शकते, विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात जिथे संसर्गाचा धोका जास्त असतो.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in