Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?
Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष; कोण मारणार बाजी?

राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपदांसाठी व थेट अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत भाजपला मोठा धक्का

फुलंब्री नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून आमदार अनुराधा चव्हाण आणि मंत्री अतुल सावे यांना राजकीय पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी ठरले आहेत.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : मुखेड नगरपरिषदेच्या निकालाची स्थिती काय?

मुखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी खतगावकर यांनी पहिल्याच निवडणुकीत यश संपादन केले आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : वेंगुर्ल्यात मंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का, निकाल कोणाच्या बाजूने?

वेंगुर्ल्यात एकूण ८ नगरसेवक पदांपैकी केवळ एकच जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली असून उर्वरित जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. विशेष म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर असलेला उमेदवारही भाजपचाच आहे.

वेंगुर्ला नगरपरिषद : विजयी नगरसेवकांची यादी

  • लीना समीर म्हापणकर - शिवसेना (शिंदे गट)

  • रवींद्र रमाकांत शिरसाट - भाजप

  • गौरी माईनकर - भाजप

  • प्रीतम सावंत - भाजप

  • विनायक गवंडकर - भाजप

  • गौरी मराठे - भाजप

  • आकांक्षा परब - भाजप

  • तातोबा पालयेकर - भाजप

एकूण निकाल पाहता वेंगुर्ल्यात भाजपची स्पष्ट आघाडी दिसून येत आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : जव्हार नगरपरिषदेचा निकाल काय?

पालघर जिल्ह्यातील जव्हार नगरपरिषदेत भाजपने आघाडी घेतली आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भाजपाचे ३ उमेदवार विजयी झाले असून, शिवसेना शिंदे गटाचा १ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा १ उमेदवार विजयी ठरला आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : जेजुरी नगरपरिषद निकालाचे अपडेट्स काय?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बारभाई यांनी विजयाकडे आघाडी घेतली आहे. तसेच या गटाचे एकूण १७ उमेदवार विजयी होत आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, जेजुरी नगरपरिषदेत भाजप गटाचे दोन उमेदवार विजयी झाले असून, तानाजी खोमणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे.

Nashik Nagar Parishad Election Result 2025 Live Updates :  नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष

नाशिक जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सध्या खालील ठिकाणी आघाडी आणि निकालाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.   

भगूर: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे विजयी ठरल्या आहेत.

ओझर: भाजपच्या अनिता घेगडमल आघाडीवर आहेत.

पिंपळगाव बसवंत: भाजपचे डॉ. मनोज बर्डे आघाडीवर आहेत.

इगतपुरी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शालिनी खताळे आघाडीवर आहेत.

सिन्नर: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विठ्ठलराजे उगले यांनी आघाडी घेतली आहे.

त्र्यंबकेश्वर: भाजपचे कैलास घुले आघाडीवर आहेत.

मतमोजणी सुरू असून पुढील घडामोडींसाठी लाईव्ह अपडेट्स येत आहेत.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निलेश राणेंच्या मालवणमध्ये शिवसेनेची बाजी  

बहुचर्चित कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार पिछाडीवर असून शिवसेनेचे संदेश पारकर यांनी आघाडी घेतली आहे. मालवणमध्येही भाजप उमेदवाराला मागे टाकत शिवसेनेचा उमेदवार पुढे आहे. तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आघाडीवर असून, या दोन्ही ठिकाणी निलेश राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्याच्या निकालांनुसार दोन्ही नगरपरिषदांमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

Gadchiroli Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : गडचिरोली जिल्ह्यातील मतमोजणीला सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. गडचिरोली नगरपरिषदेची मतमोजणी कृषी महाविद्यालयात, देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात, तर आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुकास्तरीय लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयात पार पडणार आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून प्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जात आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Live Updates : मतमोजणीला सुरुवात, संपूर्ण राज्याचं निकालाकडे लक्ष

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले. तर दुसऱ्या टप्प्यातील २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह १५४ सदस्यपदांसाठी शनिवारी (२० डिसेंबर) मतदान पार पडले. या दोन्ही टप्प्यातील मतमोजणी आज (२१ डिसेंबर) होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार? राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काय असणार आहे, त्याचे अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊया.

logo
marathi.freepressjournal.in