सभागृहात एकच हशा; मंत्री झिरवळ प्रश्न विचारणाऱ्या आमदाराला म्हणाले 'मंत्री महोदय'

पावसाळी अधिवेशनात सोमवारी प्रश्न विचारणाऱ्या आमदाराला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्री महोदय म्हटले आणि विधानसभा सभागृहात एकच हशा पिकला. आमदार आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी पाडवी यांना दोन वेळा मंत्री महोदय असे म्हटले.
सभागृहात एकच हशा; मंत्री झिरवळ प्रश्न विचारणाऱ्या आमदाराला म्हणाले 'मंत्री महोदय'
Published on

मुंबई : पावसाळी अधिवेशनात सोमवारी प्रश्न विचारणाऱ्या आमदाराला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्री महोदय म्हटले आणि विधानसभा सभागृहात एकच हशा पिकला. आमदार आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यावर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी पाडवी यांना दोन वेळा मंत्री महोदय असे म्हटले. एकदा सांगितल्यानंतरही पुन्हा दुसऱ्या वेळी पुन्हा मंत्री महोदय म्हटल्याने हशा पिकला.

अक्कलकुवा तालुक्यात सध्या फॅक्टरीत टँकर लावून तेल भेसळ केली जात आहे. नंदुरबार जिल्हा पूर्णपणे आदिवासी जिल्हा आहे. मी ज्या मतदारसंघातून येतो तो शंभर टक्के आदिवासी भाग आहे. या भागात काही लोकांना कर्करोग झाला तर काहींना इतर गंभीर आजार आहेत. मागेही तक्रार केली असताना २५ लाखांचा माल जप्त केला होता, पण काही दिवसांत ते तेल चांगले आहे असे सांगून परत केले होते. हा तेल भेसळ करणारा व्यक्ती आमच्या आदिवासी बांधवांना या तेलामुळे आजारी पाडत आहे. त्याच्यावर कारवाई होईल का?, असा प्रश्न अमश्या पाडवी यांनी सभागृहात उपस्थित केला. सदस्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आमदार आमश्या पाडवी यांना चक्क मंत्री महोदय म्हटले. विशेष म्हणजे सदस्य अमश्या पाडवी यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना मी मंत्री नाही, असे स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही मंत्री झिरवाळ यांनी पुन्हा एकदा पाडवी यांना मंत्री महोदय संबोधले आणि सभागृहात एकच हास्य उडाले. दोन वेळा अमश्या पाडवी यांना मंत्री महोदय म्हटल्याने सभागृहात हशा पिकला होता.

logo
marathi.freepressjournal.in