राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल : नार्वेकर 'या' दिवशी निर्णय देण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष
राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल : नार्वेकर 'या' दिवशी निर्णय देण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी शरद पवारांना मोठा धक्का देत अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आणि घड्याळ हे चिन्हही अजित पवारांना बहाल केले. तर, शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकालदेखील लवकरच अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात हा निकाल येईल असं समजतंय. या निकालाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. १४ किंवा १५ फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निकाल देण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर नार्वेकर यांचादेखील निर्णय तोच असणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज संध्याकाळपर्यंत पक्षासाठी नाव आणि चिन्ह सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज शरद पवार गटाकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह सादर केले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने पक्षासाठी 'मी राष्ट्रवादी पार्टी' हे नाव आणि 'उगवता सूर्य' हे चिन्ह निवडले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अजितदादांसोबत कोण?

महाराष्ट्रातील ४१ आमदार

नागालँडमधील ७ आमदार

झारखंड १ आमदार

लोकसभा खासदार २

महाराष्ट्र विधानपरिषद ५

राज्यसभा १

शरद पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील आमदार १५

केरळमधील आमदार १

लोकसभा खासदार ४

महाराष्ट्र विधानपरिषद ४

राज्यसभा - ३

logo
marathi.freepressjournal.in