महाराष्ट्राचे नवे राज्यपाल देवव्रत आज घेणार शपथ

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा सोमवारी राजभवनात पार पडणार आहे. रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल देवव्रत आज घेणार शपथ
Photo : X (@maha_governor)
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा सोमवारी राजभवनात पार पडणार आहे. रविवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे मावळते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड करण्यात आल्याने राज्याच्या राज्यपालपदाची सूत्रे सध्या गुजरातचे राज्यपाल आचर्य देवव्रत यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्यानुसार आचार्य देवव्रत सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असून सोमवारी राजभवनात त्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी दुपारी देवव्रत मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे मुंबईत स्वागत केले.

पोलिसांकडून मानवंदना

आचार्य देवव्रत यांचे मुंबईतील मुंबई सेंट्रल स्थानकात आगमन होताच मुंबई पोलिसांकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर देवव्रत राजभवन येथे पोहचल्यानंतरही पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in