महाराष्ट्र वन विभागाचे यश! ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात

‘ऑपरेशन तारा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षांची मादी वाघीणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात आणले.
महाराष्ट्र वन विभागाचे यश! ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात
Published on

कोल्हापूर : ‘ऑपरेशन तारा या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत महाराष्ट्र वन विभागाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली दोन वर्षांची मादी वाघीणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथील सोनारली अनुकूलन कुंपणात आणले.

ही वाघीण ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातून सुरक्षितपणे पकडण्यात आली होती. त्यांनंतर तिची सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) व प्रमुख (रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प) डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी केलेल्या तपासणीत वाघीण पूर्णतः तंदुरुस्त, निरोगी व स्थलांतरास योग्य असल्याचे निदर्शनास आले.

ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात
ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात

यामुळे वाघीण सुरक्षित कुंपणात राहून तेथील भूभाग, भक्ष्य प्रजाती व स्थानिक पर्यावरणाशी हळूहळू जुळवून घेते. यामुळे खुल्या जंगलात सोडण्यापूर्वी तिचे सुरक्षित पुनर्स्थापन, नैसर्गिक हालचाल व क्षेत्रीय स्थैर्य अधिक प्रभावीपणे साध्य होते.

ही कार्यवाही भारतीय वन्यजीव संस्थेच्या (WII) वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. डॉ. के. रमेश, वरिष्ठ वैज्ञानिक, WII तसेच श्री आकाश पाटील, फील्ड बायोलॉजिस्ट, WII वाघीणीच्या अनुकूलन प्रक्रियेचे व वर्तणुकीचे शास्त्रीय निरीक्षण करीत आहेत.

राष्ट्रीय पातळीवर या कार्यक्रमाचे निरीक्षण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण करीत असून, या मोहिमेवर डॉ. नंदकिशोर काळे - सहाय्यक निरीक्षक (प्रोजेक्ट टायगर) व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे विशेष लक्ष आहे.

ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात
ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात

वाघीणीची सुरक्षित पकड, वाहतूक आणि सॉफ्ट रिलिजची संपूर्ण प्रक्रिया ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या रॅपिड रेस्क्यू टीम व कोलारा कोअर रेंजमधील क्षेत्रीय वन कर्मचारी यांच्या उत्कृष्ट समन्वयामुळे यशस्वीपणे पार पडली.

ही संपूर्ण क्षेत्रीय कार्यवाही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त पथकांद्वारे राबविण्यात येत असून, या मोहिमेचे नियोजन व अंमलबजावणी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), मुंबई डॉ. जितेंद्र रामगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

वाघीण कोलारा कोअर रेंज, पांढरपौनी परिसरातील तरुण, सशक्त व नैसर्गिकरीत्या भ्रमणशील मादी आहे. तिचे आरोग्य उत्कृष्ट असून, स्थलांतरासाठी ती सर्वार्थाने योग्य आहे. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत स्थलांतरित होणारी ही दुसरी मादी असून, तिची उपस्थिती सह्याद्री परिसरातील वाघ संवर्धनास अधिक बळकटी देईल.

डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात
ताडोबामधील दुसरी वाघीण महत्त्वाकांक्षी 'ऑपरेशन तारा' उपक्रमांतर्गत चांदोली कुंपणात

ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबामधून आलेल्या दुसऱ्या मादी वाघीणीचे स्थलांतर हे सह्याद्रीतील वाघ पुनर्स्थापन मोहिमेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. वाघीण पूर्णतः निरोगी असून, चांदोली परिसरात तिला आवश्यक असा सुरक्षित अधिवास व पुरेशा प्रमाणात भक्ष्यसाठा उपलब्ध आहे. आमची क्षेत्रीय पथके व शास्त्रीय तज्ञ संस्था तिच्या सातत्यपूर्ण देखरेखीसाठी पूर्णतः सज्ज आहेत.

तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

“ऑपरेशन तारा’ अंतर्गत ताडोबा व सह्याद्री या व्याघ्र प्रकल्पांमधील उत्कृष्ट समन्वयामुळे राज्यातील वाघ संवर्धन चळवळ अधिक भक्कम होत आहे. दुसऱ्या मादी वाघीणीचे यशस्वी पुनर्स्थापन हे आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचे व समर्पणाचे प्रतीक आहे.”

एम. श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) व मुख्य वन्यजीव प्रतिपाल

logo
marathi.freepressjournal.in