राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटी

भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील सुमारे ९९० कोटी रुपयांच्या दोन प्रमुख पायाभूत रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
Indian Railway
राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील सुमारे ९९० कोटी रुपयांच्या दोन प्रमुख पायाभूत रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये मध्य रेल्वेअंतर्गत १०.८६ किमी लांबीच्या चौक-कर्जत मार्गाचे दुहेरीकरण आणि दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत मुकुटबन ते गडचांदूर दरम्यान ३८.२१ किमीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे गाड्यांची क्षमता वाढेल, मालवाहतूक सुलभ होईल आणि राज्यातील प्रमुख औद्योगिक व खाण क्षेत्रांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आहे.

चौक-कर्जत दुहेरीकरण प्रकल्प (खर्च: ४९७ कोटी) पनवेल-चौक-कर्जत हा मार्ग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्याचा एकेरी मार्ग वाढत्या वाहतुकीसाठी अपुरा पडत असून गाड्यांचा खोळंबा होतो.

मुकुटबन-गडचांदूर नवीन मार्ग (खर्च: ४९३ कोटी) यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर दरम्यान ३८.२१ किमीचा नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे. हा संपूर्ण परिसर सिमेंट कारखाने, वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींनी वेढलेला आहे.

हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर वार्षिक ६.०८ एमटीपीए मालवाहतूक हाताळेल. स्थानिक प्रवाशांसाठी दोन्ही दिशांना दररोज २ मेमू गाड्या चालवल्या जातील.या नव्या मार्गामुळे औद्योगिक पट्टा आणि माजरी-नांदेड मार्गादरम्यानचे अंतर कमी होईल.वर्धा-माणिकगड आणि प्रचंड गर्दी असलेल्या बल्हारशा-नागपूर रेल्वे मार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

अतिरिक्त नव्या गाड्या शक्य

चौक-कर्जत दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशांना दररोज ५ अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवणे शक्य होईल. वार्षिक १८.३५ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक हाताळता येईल. मालगाड्यांचा विनाकारण होणारा खोळंबा कमी होऊन या कॉरिडॉरवरील वाहतूक वेगवान होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in