८३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; राज्यपालांच्या हस्ते केले सन्मानित

राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.
८३ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान; राज्यपालांच्या हस्ते केले सन्मानित
Published on

मुंबई : राष्ट्रपतींनी जाहीर केलेली पोलीस शौर्य पदके, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्यातील ८३ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

राजभवन येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक प्रदान सोहळ्यामध्ये २०२१ तसेच २०२२ या दोन वर्षांच्या स्वातंत्र्यदिनी जाहीर झालेली पोलीस पदके देण्यात आली.

४१ पोलीस अधिकारी व जवानांना पोलीस शौर्य पदके, ३ पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच ३९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महासमादेशक गृहरक्षक दल रितेश कुमार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अर्चना त्यागी, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in