Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार - अमित शहा

पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
Shraddha Walkar Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार -  अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी श्रद्धा वालकर (Shraddha walkar) हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची (Maharashtra Police) चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून आफताबबद्दल तक्रार केल्याचे तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, श्रद्धा प्रकरणात दोषींना अजिबात सोडणार नाही, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अमित शहा यांनी हे वक्तव्य केले आहे.

Shradha Walker case: श्रद्धा वालकरचा जीव वाचवता आला असता? २०२०मधल्या एका पत्राची प्रत वायरल

गुरुवारी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपींना कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा दिली जाईल. मी संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. मला देशातील जनतेला सांगायचे आहे. जे कोणी हे कृत्य केले असेल त्याला कमीत कमी वेळेत न्याय मिळवून दिला जाईल." आणि न्यायालयाकडून कठोर शिक्षा सुनावली जाईल."

आफताबच्या धमक्यांची श्रद्धाने पोलिसांना पत्र लिहून तक्रार केली होती

श्रद्धा वालकर प्रकरणाचा तपास दिल्ली आणि मुंबई पोलिस करत आहेत. दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचेही अमित शहा यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना ते म्हणाले, "जे पत्र समोर आले आहे. त्यात दिल्ली पोलिसांची कोणतीही भूमिका नव्हती. श्रद्धाने महाराष्ट्रातील एका पोलीस ठाण्यात पत्र पाठवून आफताब तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जीवे मारण्याची धमकी देत ​​असल्याचे पत्र पाठवले होते. पण कारवाई झाली नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यावेळी आमचे सरकार नव्हते, त्यामुळे त्यावेळी जो कोणी जबाबदार असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in