मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...

"माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपुत्र होते, त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले. आमच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीसुद्धा हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन प्रयत्न केले. या दोघांच्या सोबत राहून मी...
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या - 'राजीव सातव यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या...
Published on

राज्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी सकाळी सर्वप्रथम त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा विधिमंडळाच्या सचिवांकडे सोपवला. त्यानंतर भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्यासोबत हिंगोलीमधील त्यांचे काही समर्थक-कार्यकर्तेही उपस्थित होते.

...म्हणून भाजपमध्ये प्रवेश - प्रज्ञा सातव

यावेळी बोलताना, "माझे पती सर्वांचे लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमीपुत्र होते, त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले. आमच्या मातोश्री रजनीताई सातव यांनीसुद्धा हिंगोलीच्या विकासासाठी आजीवन प्रयत्न केले. या दोघांच्या सोबत राहून मी गेले २० वर्षे विविध प्रकारे एनजीओंच्या किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून काम करीत होते, नंतर साहेबांच्या निधनानंतर २०२१ विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वांच्या आग्रहास्तव राजीव सातव यांचं जे विकासकामांचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्यामध्ये हातभार म्हणून साथ द्यायची आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजीवभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज भाजपमध्ये सामील होत आहोत", असे प्रज्ञा सातव म्हणाल्या. तसेच, यापुढे आपण सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास व सबका विश्वास या धोरणानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली.

गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली होती. गेल्या वर्षी त्यांना काँग्रेसने पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवले होते.

राजीव सातव हे २०१४ ते २०१९ दरम्यान हिंगोलीचे खासदार होते. मोदी लाटेतही राजीव सातव हे दोनदा खासदार म्हणून निवडून गेले होते. २०१९ नंतर काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकीची जबाबदारी असताना राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपच्या नाकी नऊ आणले होते. भाजपला त्यावेळी काठावरचे बहुमत मिळाले होते. राजीव सातव यांनी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे स्थान निर्माण केले होते. ते राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा असा राजकारणातील प्रवास करत काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले होते.

logo
marathi.freepressjournal.in