राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

मान्सूनचे काही दिवसांपूर्वीच राज्यात आगमन झाले असले तरी पावसाने दडी मारली आहे. मात्र आता राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाण्याला पुढील तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
Published on

पुणे : मान्सूनचे काही दिवसांपूर्वीच राज्यात आगमन झाले असले तरी पावसाने दडी मारली आहे. मात्र आता राज्यात पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाण्याला पुढील तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

पावसाने गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मान्सूनचा प्रवाह काहीसा कमी झाला असला तरी आता पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे. दरम्यान, कोकणातील काही भागात गेल्या २४ तासांत मुसळधार ते अतिवृष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा त्रासदायक ठरत आहे.

सध्या गुजरात राज्यात हवेच्या वरच्या थरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, ती स्थिती अद्यापही कायम आहे.

मुंबई, ठाण्याला ‘यलो अलर्ट’

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच धुळे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली धाराशिव, अकोला, अमरावतीं, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांनाही ‘यलो अलर्ट’ पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in