
मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. छगन भुजबळ व कुटुंबियांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्या याचिकेवर न्या. शिवकुमार डिगे यांच्या न्यायालयाने सुनावणी २८ एप्रिलला निश्चित केली. सरकारी वकील गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.
बुधवारी सुनावणीच्यावेळी घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी प्रधान सचिवांतर्फे अॅीड. गिरीश कुलकर्णी यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. या प्रकरणात अंजली दमानिया मूळ तक्रारदार नाहीत किंवा साक्षीदारही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान देण्याचा हक्क आहे की नाही, असा मुद्दा उपस्थित केला.