अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोलीतून सागवानी लाकूड

अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर होणार असून केली महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची निवड
अयोध्येतील राम मंदिरासाठी गडचिरोलीतून सागवानी लाकूड

अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा वापर होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवानाची निवड झाली. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली. यानंतर आलापल्लीच्या जंगलातील अतिशय उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडले. यासाठी आज चंद्रपुरातून सागवान लाकडाची पहिली खेप रवाना झाली.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सागवान लाकडांचे काष्ठ पूजन केले. तसेच, यावेळी शोभायात्राही काढण्यात आली. दरम्यान, राम मंदिरासाठी वापरले जाणारे हे लाकूड ग्रेड थ्रीचे सागवान आहे. हे देशातील सर्वोत्तम सागवान असून राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने आलापल्लीचे सागवान निवडण्यापूर्वी डेहराडूनमध्ये राष्ट्रीय वन संशोधन संस्थेकडून देशातील सागवान लाकडाची तपासणी केली होती.

यामध्ये गडचिरोलीचे सागवान सर्वोत्तम ठरले आहे. म्हणून त्याची निवड करण्यात आल्याची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच, त्यांनी विश्वास व्यक्त केला की, "अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर हे १,००० वर्षे टिकेल. हे मंदिर भव्य, दिव्य आणि मजबूत बांधले जाणार आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in