अनुसूचित जमातीच्या यादीत दुरुस्ती करा; 'मन्नेरवारलू' वगळून 'कोलावार' उल्लेख करण्याची आदिवासी संघटनेची मागणी

आंध्र प्रदेशात ‘मन्नेरवारलू’ जमातीऐवजी कोलावार असा बदल २००२च्या सुधारणा कायद्यानुसार करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या अनुसूचित जमाती यादीतही दुरुस्ती करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्र्यांकडे केली आहे.
आरक्षण (Reservation)
Published on

मुंबई : महाराष्ट्रातील ‘मन्नेरवारलू’ या जमातीचा उगम आंध्र प्रदेशमधून झाला असल्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (सुधारणा) कायदा २००२ प्रमाणे आंध्र प्रदेश राज्यात ‘मन्नेरवारलू’ जमात वगळून त्याऐवजी कोलावार अशी दुरुस्ती करून कायद्यात सुधारणा केली. राज्य सरकारने याच धर्तीवर महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत दुरुस्ती करून सुधारणा करावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री यांच्याकडे केली आहे.

आंध्र प्रदेशात अनुसूचित जमातीच्या यादी औरंगाबाद विभागातील जिल्ह्यांचा मन्नेरवारलू अशी नोंद आहे. मध्य प्रदेशमध्येही विदर्भातील जिल्ह्याचा समावेश केला आहे. परंतु, राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ अन्वये आंध्र प्रदेश राज्यातील औरंगाबाद विभागातील त्यावेळेस अस्तित्वात असलेले एकत्रित जिल्हे औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांचा समावेश होता. त्यानंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी हैदराबाद राज्यातील औरंगाबाद महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील क्षेत्राचा तत्कालीन महाराष्ट्र राज्यात समावेश झाला. त्यामुळे कोलाम, मन्नेरवारलू ही नोंद जशीच्या तशी महाराष्ट्रात आली. सध्या आंध्र प्रदेश राज्यात ‘मन्नेरवारलू’ जमातीच्या नामसदृशचा फायदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो आहे. तेथील राज्य शासनाच्या शिफारशीवरून केंद्र शासनाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अशी सुधारणा केली. त्यासंबंधित आदेश २००२ आंध्र प्रदेश राज्यासाठी लागू केला.

logo
marathi.freepressjournal.in