राज्यातील १८ हजार शाळा बंद पडण्याची भीती; संच मान्यतेचे निकष बदलूनच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करा : मुंबई मराठी अध्यापक संघाची मागणी

सन २०२४-२५ च्या संच मान्यतेमध्ये जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले होते. त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासनाने धोरण निश्चित केलेले होते. परंतु, चालू वर्षाची संच मान्यता नोव्हेंबरपूर्वी होणे अपेक्षित होते.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या संच मान्यतेनंतरच शिक्षकांचे समायोजन करा, असे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. मात्र जोपर्यंत नववी दहावीच्या वर्गांना विद्यार्थी संख्येची अट काढून तीन विषय शिक्षक देऊन संच मान्यतेत दुरुस्ती न केल्यास राज्यातील १८ हजार शाळा बंद पडण्याची भीती मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली आहे.

सन २०२४-२५ च्या संच मान्यतेमध्ये जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त झाले होते. त्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत शासनाने धोरण निश्चित केलेले होते. परंतु, चालू वर्षाची संच मान्यता नोव्हेंबरपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्याने पुन्हा डिसेंबर महिन्यात सन २०२५-२६ ची संचमान्यता पूर्ण झाली तर पुन्हा अतिरिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे लागणार आहे. त्यामुळे ही प्रकिया वारंवार करण्यापेक्षा सन २०२५-२६ ची संचमान्यता पूर्ण झाल्यानंतरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांनी दिल्या आहेत. याला विरोध करत संघटनेने संच मान्यतेत दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. नववी दहावीच्या वर्गांना विद्यार्थी संख्येची अट टाकल्यास राज्यातील जवळपास १८ हजार शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in