राज्यात होणार सी-प्लेनसह हेलिकॉप्टर सेवा सुरू ; 'या' ८ ठिकाणी उड्डाणांची तयारी

देशासह राज्यभरातील पर्यटनस्थळांच्या सुधारणेकडे सध्या सरकारकडून लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडूनही पर्यटनस्थळ विकास अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. राज्यात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत की ती दुर्गम भागात असून त्याठिकाणी दळणवळणसह पर्यटन सुविधा नाहीत. अशा दुर्गम भाग हवाई सेवेने जोडण्यासाठी ‘उडान ५५’ योजनेंतर्गत हेलिकॉप्टर सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात होणार सी-प्लेनसह हेलिकॉप्टर सेवा सुरू ; 'या' ८ ठिकाणी उड्डाणांची तयारी
Published on

कराड : देशासह राज्यभरातील पर्यटनस्थळांच्या सुधारणेकडे सध्या सरकारकडून लक्ष दिले जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडूनही पर्यटनस्थळ विकास अंतर्गत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. राज्यात अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत की ती दुर्गम भागात असून त्याठिकाणी दळणवळणसह पर्यटन सुविधा नाहीत. अशा दुर्गम भाग हवाई सेवेने जोडण्यासाठी ‘उडान ५५’ योजनेंतर्गत हेलिकॉप्टर आणि 'सी-प्लेन' सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील आठ ठिकाणी 'एअरो ड्रोम' (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात आठ ठिकाणांपैकी सातारा जिल्ह्यातील वाई येथील धोम जलाशयाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, आशी माहिती देण्यात आली.

'सी-प्लेन' सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील आठ ठिकाणी 'एअरो ड्रोम' (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील आठ ठिकाणे कोणती?

  • धोम धरण (वाई, सातारा)

  • गंगापूर धरण (नाशिक)

  • खिंडसी धरण (नागपूर)

  • कोराडी धरण (मेहकर, बुलढाणा)

  • पवना धरण (पवनानगर, पुणे)

  • पेंच धरण (पारशिवनी, नागपूर)

  • गणपतीपुळे (रत्नागिरी)

  • रत्नागिरी (रत्नागिरी).

logo
marathi.freepressjournal.in