दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत चार लाख कोटींहून अधिकचे सामंजस्य करार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

"जागतिक आर्थिक परिषदेकडून आम्हाला एक मोठे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. यात पर्यावरण आणि तंत्रज्ञानावर चर्चा केली जाते. महाराष्ट्र हे उद्योगांसाठी आवडते ठिकाण आहे. आमचे धोरण अतिशय लवचिक आणि उद्योगाभिमुख आहे. महाराष्ट्रातील लोक खूप सकारात्मक आणि सहकार्य करणारे आहेत", असेही त्यांनी सांगितले.
दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत चार लाख कोटींहून अधिकचे सामंजस्य करार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

स्वित्झर्लंडमधील दावोस शहरात 15 ते 19 जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आपल्या शिष्टमंडळासह या परिषदेत सहभागी झाले आहेत. जागतिक आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्याने 4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे सुमारे 46 अब्ज रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ANI शी बोलताना दिली.

"लोक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. या परिषदेत काल आणि आज विविध करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आम्हाला सुमारे 3 लाख कोटींची अपेक्षा होती, परंतु 4 लाख कोटींहून अधिक म्हणजे सुमारे 46 अब्ज रुपयांचे सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली", असे मुख्यमंत्री म्हणाले.

"जागतिक आर्थिक परिषदेकडून आम्हाला एक मोठे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले आहे. यात पर्यावरण आणि तंत्रज्ञानावर चर्चा केली जाते. महाराष्ट्र हे उद्योगांसाठी आवडते ठिकाण आहे. आमचे धोरण अतिशय लवचिक आणि उद्योगाभिमुख आहे. महाराष्ट्रातील लोक खूप सकारात्मक आणि सहकार्य करणारे आहेत", असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमधील संबंध चांगले असून डबल इंजिन सरकार कार्यरत आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in