राज्यातील SIR प्रक्रियेला आक्षेप; वंचितच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर सुनावणी

महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेविरोधातील याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.
राज्यातील SIR प्रक्रियेला आक्षेप; वंचितच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर सुनावणी
राज्यातील SIR प्रक्रियेला आक्षेप; वंचितच्या याचिकेवर तीन आठवड्यानंतर सुनावणीउच्च न्यायालयाचे संग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (एसआयआर) प्रक्रियेविरोधातील याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांसाठी तहकूब केली. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचिकेची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलली.

एसआयआर प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळली जाण्याची भीती व्यक्त करून वंचित बहुजन आघाडीच्या युवा संघटनेचे अध्यक्ष सागर रमेश गवई आणि रफीक इलाही खान यांनी वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत याबाबत याचिका दाखल केली आहे.

युवा संघटनेचे अध्यक्ष सागर रमेश गवई आणि रफीक इलाही खान यांनी वकील हितेंद्र गांधी यांच्यामार्फत याबाबत याचिका दाखल केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाच्या वकिलांने एसआयआर संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने उच्च न्यायालयांना कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती न्यायालयाला दिली. याची दखल घेत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून सुनावणी तीन आठवडे तहकूब ठेवली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in