Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीच्या परीक्षेचा आज निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ८ मे, २०२६ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीच्या परीक्षेचा आज निकाल
Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीच्या परीक्षेचा आज निकाल
Published on

पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ८ मे, २०२६ रोजी दुपारी ठीक १.०० वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील अधिकृत प्रकटन प्रसिद्ध केले असून, राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधील विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर एकाच वेळी प्रसिद्ध केले जातील. शाळांना त्यांच्या शाळेचा एकत्रित निकाल त्यांच्या अधिकृत लॉगिनमध्ये पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती हव्या आहेत, त्यांच्यासाठी मंडळाने ऑनलाईन अर्जाची सोय केली आहे. यासाठी शनिवार, ९ मे २०२६ ते शनिवार, २३ मे २०२६ या कालावधीत स्वतः किंवा शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज करता येईल. गुणपडताळणी, छायाप्रत किंवा पुनर्मूल्यांकनासाठी आवश्यक असलेले शुल्क विद्यार्थी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारे भरू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे आहे, त्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून पाच कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत विहित नमुन्यात शुल्क भरून पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुण पाहण्यासाठी

results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, sscresult.mkcl.org, results.targetpublications.org, results.navneet.com या संकेतस्थळांचा वापर करता येईल. याशिवाय, विद्यार्थ्यांना डिजीलॉकर या मोबाईल ॲपवरही आपली डिजिटल गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आली असून, ती डाऊनलोड करून जतन करण्याची सोय मंडळाने केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in