Maharashtra SSC Supplementary Results 2023 : दहावीच्या पुरवणी परिक्षेचा लातूर बाजी ; मुंबई विभाग निकाल सर्वात कमी

महाराष्ट्र शिक्षण मंडळाने एका परिपत्रकाद्वारे दहावीच्या निकालासह टक्केवारी जाहीर केली आहे .
Maharashtra SSC Supplementary Results 2023 : दहावीच्या पुरवणी परिक्षेचा लातूर बाजी ; मुंबई विभाग निकाल सर्वात कमी

आज(28 ऑगस्ट) राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. संपूर्ण राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला असू निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आला आहे. तर यावर्षी सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने एका परिपत्रकाद्वारे दहावीच्या निकालासह टक्केवारी जाहीर केली आहे .

दहावीच्या पुरवणी परिक्षेच्या निकालात यावेळी राज्यातून लातूर विभाग सर्वप्रथम आला आहे. तर त्याखालोखाल अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई हे विभाग आले आहेत. या वेळीचा सर्वात कमी 15.75 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

राज्यातील विभागवार निकाल

* लातूर - 51.47 %

*अमरावती- 43.37%

*नागपूर - 41.90%

*नाशिक - 41.90 %

*औरंगाबाद - 37.25 %

*कोल्हापूर - 29.18 %

*पुणे - 22.22%

*मुंबई - 15.75 2%

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत घेतली होती. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी 49 हजार 377 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मागच्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालाची आकडेवारी खूप घसरलेली दिसून आली. या निकालाबाबत काही आक्षेप असल्यास किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचा असेल तर 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in