राज्य सहकारी बँकेचा १० टक्के लाभांश; ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची ११५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात १० सप्टेंबर रोजी पार पडली. यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने मिळविलेला भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभेने बहुमताने मान्यता दिली.
राज्य सहकारी बँकेचा १० टक्के लाभांश; ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय
राज्य सहकारी बँकेचा १० टक्के लाभांश; ११५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णयसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची ११५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयातील सहकार सभागृहात १० सप्टेंबर रोजी पार पडली. यंदाच्या आर्थिक वर्षात बँकेने मिळविलेला भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या १० टक्के लाभांशास सभेने बहुमताने मान्यता दिली.

सभेला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय भेंडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार राजेश टोपे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित होते.

राज्य बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहकार मंत्र्यांनी राज्य बँकेच्या आर्थिक प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत प्रशासक विद्याधर अनास्कर व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. राज्य बँकेने प्रशासकीय कार्यालय, वाशी येथे सहकारी बँकांकरिता उभारलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरचे कौतुक केले. जिल्हा बँका व नागरी बँकांनी ऑनबोर्ड व्हावे असे आवाहन केले.

सर्वाधिक नक्त मूल्य असलेली बँक

बँकिंग व्यवहारात बँकेचा पाया मजबूत असणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी बँकेचे नक्त मुल्य (नेटवर्थ) तपासले जाते. मार्च २०२६ अखेर राज्य बँकेचे नक्त मुल्य ५,७४७ कोटी रुपये असून, गत वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये ३५१ कोटीची भरीव वाढ झाली आहे.

बँकेचा ७०२ कोटींचा निव्वळ नफा

राज्य बँकेने मागील आर्थिक वर्षात ६५१ कोटीचा निव्वळ नफा कमविला होता. यावर्षी मात्र बँकेला ७०२ कोटीचा निव्वळ नफा झाला असून, त्यामध्ये शासनाकडून थकहमीपोटी प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमांचा समावेश नाही.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in