राज्य शासनाचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस; २० मार्चला लिलाव

राज्य शासनाचे ३ हजार कोटींचे रोखे विक्रीस; २० मार्चला लिलाव

महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या १४ वर्षे मुदतीच्या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री २० मार्च २०२४ रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र, एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल. २० मार्च २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल, तर लिलावाचे बीड‌्स संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाचे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in