

मुंबई : महापारेषणमधील आयोजित आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा - कलाकुंभ २०२४ यंदा नाशिक येथे होणार असून त्याचे उद्घाटन ६ जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे.
महापारेषण कंपनीमधील कर्मचाऱ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी महापारेषण कंपनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून यावर्षी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.
नाट्य स्पर्धेसाठी राज्यभरातील ८ परिमंडळ व सांघिक कार्यालय असे एकूण नऊ नाटके सादर करण्यात येणार आहे. यामध्ये कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहेत. नाशिकमधील शालीमार येथील महावीर कालिदास कलामंदिरमध्ये चार दिवस या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सतीश चव्हाण, संचालक (संचलन), अविनाश निंबाळकर, संचालक (प्रकल्प), तृप्ती मुधोळकर, संचालक (वित्त), सुगत गमरे, संचालक (मासं), भरत पाटील, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी व मुख्य समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती असेल.
प्रसिद्ध मराठी सिनेमा कलाकार कुशल बद्रिके हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन संजीव भोळे, मुख्य अभियंता, नाशिक परिमंडल यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
प्रवीण भालेराव, अधीक्षक अभियंता, अनिल भारसाकळे, अधीक्षक अभियंता, संजय अत्राम, अधीक्षक अभियंता, मनीष खत्री, अधीक्षक अभियंता, प्रकाश लिमकर, अधीक्षक अभियंता, (स्था), मिलिंद घोलप, सहाय्यक महाव्यवस्थापक (विवले), चंद्रशेखर बोराडे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) यांच्यासह ही स्पर्धा आयोजन समिती करणार आहे. चार दिवस या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले महापारेषण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी विविध कला ही नाटकाच्या माध्यमातून सादर करणार आहे.