साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज

पावसाचा ताण आणि घटलेला साखरेचा उतारा (रिकव्हरी रेट) यामुळे आगामी गाळप हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनने (विस्मा) दिली आहे.
साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाज
साखर उत्पादनात २० टक्के घट; 'विस्मा'चा अंदाजप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

छत्रपती संभाजीनगर : पावसाचा ताण आणि घटलेला साखरेचा उतारा (रिकव्हरी रेट) यामुळे आगामी गाळप हंगामात महाराष्ट्रातील साखर उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशनने (विस्मा) दिली आहे. 'विस्मा'चे अध्यक्ष भैरवनाथ ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यात पावसाची तीव्र तूट भासल्यामुळे ऊसासह इतर सर्वच पिकांच्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे यंदा राज्यातील साखर उत्पादन २० टक्क्यांनी घटून सुमारे ८० लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे. गेल्या २०२५-२६ च्या हंगामात महाराष्ट्राने सुमारे ९९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते.

पाण्याचा तुटवडा

कारखाने चालवण्यासाठी पाण्याची मोठी टंचाई असून, आगामी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे कारखाने चालवणे कठीण होईल. शासनानेही धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले आहे. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत गेल्या ४५ दिवसांपासून पाऊस न पडल्याने उभे पीक वाळू लागले आहे. ऊस लवकरात लवकर गाळपासाठी गेला तरच शेतकऱ्यांना काही भरपाई मिळेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in