दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा निकाल ३६.४८ टक्के, तर बारावीचा निकाल ४३.६५ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत जून जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल ३६.४८ टक्के, तर बारावीचा निकाल ४३.६५ टक्के लागला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत जून जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर करण्यात आला. राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल ३६.४८ टक्के, तर बारावीचा निकाल ४३.६५ टक्के लागला आहे.

राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा २४ जून ते ८ जुलै व बारावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. बारावी परीक्षेसाठी राज्यभरातून ७४ हजार १३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७२ हजार ५५४ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ३१ हजार ६७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ४३.६५ आहे. विज्ञान शाखेचा निकाल ६४.७८ टक्के, कला शाखेचा निकाल ३६.१७, वाणिज्य शाखा २०.७४ टक्के निकाल लागला आहे. राज्यभरातून ४८ हजार ६३ हजार मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी २० हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर २४ हजार ४९१ मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ११ हजार ६२६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

मुंबई मंडळातून २० हजार ९६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार २३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या मंडळाचा निकाल ३४.५० टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल कोकण मंडळाचा लागला आहे. कोकण मंडळातून ३९० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दहावी परीक्षेचा राज्याचा निकाल ३६.४८ टक्के लागला आहे. मुंबई मंडळाचा निकाल १९.४२ टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल पुणे मंडळाचा लागला आहे. पुणे मंडळातून ७ हजार ४२३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ १ हजार ९०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण मंडळाचा निकाल २७.६५ टक्के लागला आहे. कोकण मंडळातून १८८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in