MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात

विधान परिषद निवडणूक : सत्ताधारी महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे.
MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात
MLC Election 2026 : शिक्षक, ‘पदवीधर’साठी आज मतदान; मतदानासाठी यंत्रणा सज्ज; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणातप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : सत्ताधारी महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. महायुती आणि विरोधी पक्षातील बंडखोरीमुळे प्रचंड चुरशीच्या ठरलेल्या या पाचही मतदारसंघातील सुशिक्षित मतदार कुणाला कौल देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोबरला होऊन तेव्हाच निकाल जाहीर केला जाईल.

विधान परिषदेच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरूवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल. मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून १० लाखाहून अधिक मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला करतील.

मतदारसंघनिहाय मतदार

  • पुणे पदवीधर ........... ३ लाख ८८ हजार १९

  • नागपूर पदवीधर........... २ लाख ५७ हजार ३४

  • औरंगाबाद पदवीधर............ ३ लाख २७ हजार ९६१

  • पुणे शिक्षक........................ ६३ हजार ७८९

  • अमरावती शिक्षक............ ३५ हजार ८१०

महायुतीत कमालीचा बेबनाव

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात मुख्य लढत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोदी हेसुद्धा रिंगणात आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिवसेना शिंदे गट पुरस्कृत सचिन सानप आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत अशी चौरंगी लढत होत आहे. शिंदे गटाने भाजपच्या उमेदवाराला उघडपणे विरोध केल्याने येथे महायुतीत कमालीचा बेबनाव आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in