महाराष्ट्रातील तापमानात होणार वाढ; हवामान विभागाने दिला इशारा

राज्यातील तापमान हे ४ ते ६ अंश सेल्सियसने वाढणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असून केंद्र सरकारने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे
महाराष्ट्रातील तापमानात होणार वाढ; हवामान विभागाने दिला इशारा

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपिटीचा तडाखादेखील पाहायला मिळाला. परंतु, आता भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये पुन्हा एकदा गरमी वाढणार असून राज्यातील तापमान ४ ते ६ अंश सेल्सिअसने वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या २ दिवसांमध्ये कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे

ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये उष्माघाताचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये तापमानात प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली. मात्र त्यानंतर आता राज्यातील कमाल तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, विदर्भात पावसानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in