राज्यातील TET परीक्षा २३ नोव्हेंबरला; उमेदवारांना आजपासून भरता येणार अर्ज

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज करता येणार आहे.
राज्यातील TET परीक्षा २३ नोव्हेंबरला; उमेदवारांना आजपासून भरता येणार अर्ज
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांना १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा अर्ज करता येणार आहे.

शिक्षक तसेच शिक्षक सेवक पदावरील नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय व सूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती 'https://mahatet.in' या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षार्थींसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल. तसेच २०१८ आणि २०१९ च्या टीईटी गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांना संबंधित परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही.

कधी करणार अर्ज

  • ऑनलाइन अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणे : १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर

  • प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : १० ते २३ नोव्हेंबर

  • टीईटी परीक्षा : २३ नोव्हेंबर २०२५

logo
marathi.freepressjournal.in