महाराष्ट्र देशातील सर्वात समृद्ध राज्य; ‘केअर एज रेटिंग्ज’च्या अहवालातील निष्कर्ष

देशातील आर्थिक आणि सामाजिक निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्र देशातील सर्वात समृद्ध राज्य; ‘केअर एज रेटिंग्ज’च्या अहवालातील निष्कर्ष
Published on

नवी दिल्ली : देशातील आर्थिक आणि सामाजिक निकषांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर शेजारील गुजरात आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. राज्याची अर्थव्यवस्था, सरकारची आर्थिक स्थिती, पायाभूत सुविधा, आर्थिक वाढ, सामाजिक, प्रशासन आणि पर्यावरण अशा ७ निकषांमध्ये महाराष्ट्र हे देशातील सर्वात समृद्ध राज्य ठरले आहे.

‘केअर एज रेटिंग्ज’च्या ‘स्टेट रँकिंग २०२५’ या अहवालानुसार, महाराष्ट्र ५६.५ गुणांसह आर्थिक विकासात अव्वल स्थानी आहे. गुजरातने आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत अनुकूल निकालांसह दुसरे स्थान मिळवले. पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्ये पहिल्या पाच क्रमवारीत आघाडीवर आहेत. पश्चिमेकडील राज्यांनी राजकोषीय, आर्थिक आणि आर्थिक विकासाच्या बाबतीत बाजी मारली आहे, तर दक्षिणेकडील राज्यांनी आर्थिक, आर्थिक विकास, पर्यावरण आणि प्रशासन या विभागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

छोट्या राज्यांत गोवा अव्वल

आर्थिक विकास, पायाभूत सुविधा, सामाजिक, राजकोषीय विभागात गोवा हे ६२.१ गुणांसह छोट्या राज्यांमध्ये अव्वल ठरले आहे. लहान राज्यांमध्ये उत्तराखंड (४८.२ गुण) आणि सिक्कीम (४७.२) ही दोन राज्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

logo
marathi.freepressjournal.in