

मुंबई : राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. तरीही जिल्हा नियोजन व अन्य योजनांच्या अंतर्गत एक हजार कोटींच्या कामाच्या आराखड्यास मंजुरी देऊन आठ महिने उलटले, मात्र प्रत्यक्षात कामाची सुरुवात कागदावरच आहे, असा आरोप महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाने केला आहे.
सरकार स्थापन होऊन जवळपास १४ महिने झाले. हे सरकार प्रचंड बिकट आर्थिक परीस्थिती मध्ये काम करीत आहेत. मात्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जिल्हा नियोजन व इतर योजना मधुन एक एक हजार कोटींच्या कामांचा आराखड्यास मंजुरी देऊन आठ महिने होऊन गेले, प्रत्यक्षात जमिनीवर काहीही काम सुरू पण झाले नाही. कारण शासनाकडे पैसा नाही, फक्त कागदावरच आराखडा, नियोजन आणि पैसा उपलब्ध असल्याचे आव आणला जात आहे.