Ashish Deshmukh
Ashish Deshmukh

दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत आल्याशिवाय राहणार नाहीत, भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा

मागील दहा वर्षात महाराष्ट्रात जे कुणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपात येऊन पुढील राजकारण करण्याचं ठरवलं आहे.

मुंबई : मागील दहा वर्षात महाराष्ट्रात जे कुणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपात येऊन पुढील राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपात महायुतीत आल्याशिवाय राहणार नाहीत, असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना देशमुख म्हणाले, मागील दहा वर्षात महाराष्ट्रात जे कुणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपात येऊन पुढील राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपात महायुतीत आल्याशिवाय राहणार नाही. २०१४ मध्ये एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते इकडे आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील होते. तेही भाजपात आले. नंतरच्या काही काळाता अजित पवार विरोधी पक्षनेते होते, तेही भाजपात आले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं बिगुल येत्या काही महिन्यात वाजणार असून पक्ष बदलाचे वारे राजकीय वातावरणात फिरताना दिसत आहेत. भाजपमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रवेशाचं सत्र सुरु झाल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. नेत्यांचे पक्षांतर करण्याचे सत्र सुरुच आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्यानं राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहे. माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनीही भाजपची माळ गळ्यात घातली. अशातच देशमुख यांनी केलेल्या दाव्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in