'या' तगड्या उमेदवारांमध्ये होणार थेट लढत, विधानपरिषद निवडणूकीसाठी मविआ आणि महायुतीचे उमेदवार जाहीर

विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. शेवटी दोन्ही बाजूंकडील उमेदवारांची नावं जाहीर झाल्यामुळं लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे.
'या' तगड्या उमेदवारांमध्ये होणार थेट लढत, विधानपरिषद निवडणूकीसाठी मविआ आणि महायुतीचे उमेदवार जाहीर
Published on

मुंबई: येत्या २६ जून रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठीचं मतदान पार पडणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ, नाशिक शिक्षक मतदारसंघ तसेच कोकण पदवीधर मतदारसंघ या चारही मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान महाविकास आघाडी तसेच महायुती यांनी विधानपरिषदेसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

महाविकास आघाडीतील पेच मिटला, महायुतीचंही ठरलं-

महाविकास आघाडीच्या बाबतीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठा मध्ये उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून चढाओढ सुरु होती. त्याचप्रमाणे महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गट तसेच भाजप मधील इच्छुकांमध्येही स्पर्धा होती. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं कोकण पदवीधर मतदारसंघ काँग्रेसला सोडल्यामुळं महाविकास आघाडीतील वाद मिटला आहे. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मोरे यांनी निवडणूकीतून माघार घेतल्यामुळं भाजपचे निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात असणार हे स्पष्ट झालं आहे.

कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार?

नाशिक शिक्षक मतदासंघ

  • किशोर दराडे (शिवसेना एकनाथ शिंदे गट)

  • संदीप गुळवे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  • अॅडव्होकेट महेंद्र भावसार (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

मुंबई शिक्षक मतदारसंघ:

  • शिवाजी नलावडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)

  • ज.मो. अभ्यंकर (शिवसेना उद्धव ठाकरे)

  • सुभाष मोरे-(शिक्षक भारती)

  • शिवनाथ दराडे (भाजप पुरस्कृत)

मुंबई पदवीधर मतदारसंघ

  • अनिल परब (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

  • किरण शेलार (भाजप)

कोकण पदवीधर

  • निरंजन डावखरे (भाजप)

  • रमेश कीर (काँग्रेस)

logo
marathi.freepressjournal.in