

मुंबई : पुढील दोन महिन्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे आता मतदार याद्यांमध्ये बदल करणे शक्य नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारलेल्या मतदार याद्यांनुसार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकूणच मविआसह मनसेने मतदार यादीतील घोळ दूर करा, या मागणीकडे कानाडोळा केला आहे.
दुबार मतदार याद्यांच्या घोळामुळे निवडणुका पुढे ढकलाव्यात या मागणीसाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. मात्र मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण होणार नाही, अशी माहिती चोक्कलिंगम यांनी दिली.