ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले ; १८ जिल्ह्यांत एक हजार १६६ गावांमध्ये १३ ऑक्टोबरला मतदान

निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी बुधवारी दिली
ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले ; १८ जिल्ह्यांत एक हजार १६६ गावांमध्ये १३ ऑक्टोबरला मतदान

राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील एक हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होईल, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. निवडणूक जाहीर झाल्याने संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी बुधवारी दिली.

संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे २४ आणि २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in