Maharashtra Weather : मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता; महाराष्ट्रात उष्णतेची लाट

वर्ध्यात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather : मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता; महाराष्ट्रात उष्णतेची लाट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. राज्यात पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभगाने दिला आहे. तर, नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान विभागानुसार, उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रात सुरू असलेल्या हिमवृष्टीचा परिणाम हा देशातील मैदानी क्षेत्रात होत आहे. यामुळे उत्तर भारतातील तापमानात घट नोंदविली जाऊ शकते. त्यामुळे देशातील पूर्वोत्तर भागात पावसा पडण्याची शक्याता आहे. परंतु, महाराष्ट्रात उष्णते कमालीची वाढ झाली असून वर्ध्यात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर, वर्ध्यात उष्ण रात्रीचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे, आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाट असणार आहे. येत्या २४ तासात विदर्भ आणि मराठावाड्यात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

असे असे देशातील हवामान

देशातील मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा आणि गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटकात ४ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे.

पूर्व, ईशान्य भारतात १९०१ नंतर किमान तापमानात वाढ

पूर्व व ईशान्य भारतात एप्रिलमध्ये किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. १९०१ नंतरचे हे सर्वात जास्त तापमान आहे. एप्रिलमध्ये यंदा हवेचा जोर कमी असल्याने पूर्व व ईशान्य भारतात तापमान अधिक होते.

दक्षिण भारतात ३१ अंश किमान तापमानाची नोंद

दक्षिण भारतात एप्रिलमध्ये किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. १९०१ नंतर प्रथमच हे सर्वात जास्त किमान तापमान आहे. १९८० नंतर दक्षिण भारतात सामान्यापेक्षा अधिक तापमान वाढत आहे. दरम्यान, ओदिशात २०१६ नंतर पहिल्यांदाच एप्रिलमध्ये १६ दिवस उष्णतेच्या लाटांची झळ बसली.

logo
marathi.freepressjournal.in