हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. विधानभवनात बुधवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे
हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे X - MahaDGIPR
Published on: 

मुंबई : राज्य विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन ७ ते १८ डिसेंबर या कालावधीत नागपूर येथे होणार आहे. विधानभवनात बुधवारी झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कालावधीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, जलसंधारणाची कामे आणि शेतकऱ्यांना मदत या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काही विशेष घोषणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाचा कालावधी निश्चित करण्यात आला. राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

विरोधक विचारणार सरकारला जाब

जलसंधारणाच्या कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी, दुष्काळी उपाययोजना आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून करण्यात येणारी मदत या विषयांवर विरोधकांकडून सरकारला जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. विदर्भाचा अनुशेष, विकासकामांसाठी निधी आणि प्रलंबित प्रश्न यांवरही अधिवेशनात चर्चा अपेक्षित आहे. याशिवाय कर्जतमधील वृक्षतोड आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांचे मुद्देही चर्चेत येण्याची शक्यता आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)