६८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा ; मराठी कलाकारांचा बोलबाला

'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
६८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा ; मराठी कलाकारांचा बोलबाला

चित्रपट क्षेत्रातील सन्मान समजला जाणारा '६८वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा आज नवी दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाने 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली. या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ' गोदाकाठ आणि अवांछित ' या चित्रपटासाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे. 'जून' चित्रपटासाठी सिद्धार्थ मेननला विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in