साखर उत्पादनात महाराष्ट्राची बाजी, देशात पहिल्या तर जगात दुसऱ्या क्रमांकावर घेतले उत्पादन

महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात
File Photo
File PhotoANI

यंदाचा साखर हंगाम (sugarcane season) अद्यापही सुरू आहे राज्यातील काही कारखाने सुरू आहेत. दरम्यान यंदा उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचे उत्पादनही (sugarcane production) मोठ्या प्रमाणात झाले. साखर उत्पादनात ब्राझीलनंतर महाराष्ट्र देशात पहिल्या तर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Maharashtra ranks first in the country after Brazil and second in the world in terms of sugar production) यावर्षी राज्यातील 101 सहकारी आणि 98 खाजगी कारखान्यांमधून 9 जूनपर्यंत 13 कोटी 19 लाख 82 हजार टन उसातून 13 कोटी 72 लाख 23 हजार साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर कारखान्यांमध्ये ३ कोटी ६ लाख टन अधिक उसाचे गाळप झाले.

राज्यातील 199 पैकी 188 कारखाने बंद झाले आहेत तर 10 कारखाने सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील 5 कोटी शेतकरी आणि राज्यातील 40 लाख शेतकरी ऊस पीक घेतात. या हंगामात महाराष्ट्रात १३ लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. यातून १३ कोटी २० लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणाग गाळप झाले. कोल्हापुरातील कारखान्यांमधील 2 कोटी 54 लाख 69 हजार उसापासून 3 कोटी 41 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोल्हापूर विभागात झाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in