‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महर्षि वाल्मिकी यांची जयंती

महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महर्षि वाल्मिकी यांची जयंती

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये शनिवारी (दि. २८) महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव मेघश्याम सोळंके, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, उद्धव हंबर्डे, निलेश हंबर्डे, सुनिल जाधव, गोविंदराव हंबर्डे, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, दिपक हंबर्डे, प्रदिप बिडला, शंकरसिंह ठाकूर, बबन हिंगे, बाबाराव हंबर्डे यांच्यासह शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in