महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले

राज्यात दुष्काळाची पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच आढावा बैठक पार पडली.
महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले
महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी; केंद्रीय पथकाच्या आढावा बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले
Published on: 

मुंबई : राज्यात दुष्काळाची पाहणी करून गेलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच आढावा बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलले, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या बैठकीपासून पक्षनेतृत्वाला दूर ठेवल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यावर दुष्काळाची तीव्रता वाढत असून नुकताच केंद्रीय पथकाने राज्यातील दुष्काळाची पाहणी केली. या पथकाने ११ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली आणि मदतीचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर झालेल्या दुष्काळ आढावा बैठकीत महायुतीतील मित्र पक्षांचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण नव्हते. या पथकाने दुष्काळाची पाहणी करून त्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. मात्र या बैठकीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण का नव्हते, यावरून शिंदे सेना व राष्ट्रवादीत नाराजी असल्याचे शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि दुष्काळ निवारणासाठी सगळ्यांनी एकजुटीने काम करणं अपेक्षित आहे. मात्र रविवारच्या दुष्काळ आढावा बैठकीत हे चित्र दिसलं नाही. वर्षावरील बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘एनडीए’मधील घटक पक्षांना विश्वासात आणि सोबत घेऊन पुढे जातात, मात्र हीच गोष्ट महाराष्ट्रात दिसत नाही, असा आरोप शिंदे सेनेतील वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.

एकनाथ शिंदेंची दुष्काळावर पंतप्रधानांशी चर्चा

राज्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना राज्यातील दुष्काळाची भीषण परिस्थितीची माहिती दिली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर या विषयी चर्चा झाल्याचे शिंदे सेनेकडून सांगण्यात आले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in