
हारून शेख / लासलगाव
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्याच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा महायुतीच्या हातात गेल्या त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा बोलबाला असून विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. महायुतीने १४ पैकी ७ जागा अजित पवार राष्ट्रवादी, भा.ज.प. ५ तर शिंदे शिवसेना २ जागी विजय मिळवला.
नाशिक जिल्ह्यातील महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी पाचव्यांदा निवडून येण्याचा पराक्रम केला छगन भुजबळ हे २६ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर दिंडोरीतून नरहरी झिरवाळ तब्बल ४१ हजार मतांनी निवडून येत हॅट्रिक केली आहेत. तसेच देवळाली विधानसभा मतदारसंघातून सरोज अहिरे ४० हजार मतांनी दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. इगतपुरीतून हिरामण खोसकर ८६ हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. तसेच कळवणमधून नितीन पवार ८ हजार तर सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे ४० हजार मतांनी निवडून आले आहेत. तर निफाडमधून दिलीप काका बनकर हे २८ हजार मतांनी विजयी झाले आहेत.
तसेच महायुतीमधील भाजपकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हिरे या ७० हजार मतांनी, नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे १७ हजार मतांनी, चांदवडमधून डॉ.राहुल आहेर ४८ हजार मतांनी, बागलाणमधून दिलीप बोरसे १ लाख २९ हजार ६३८ मतांनी आणि नाशिक पूर्व मधून राहुल ढिकले ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे हे मालेगाव बाह्य मतदारसंघातून १ लाखाहून अधिक मतांनी पाचव्यांदा निवडून आले आहेत. तसेच सुहास कांदे नांदगावमधून ८० हजार मतांनी विजयी झाले आहेत.