नाशिक, संभाजीनगरमध्ये महायुतीत बिघाडी
नाशिक, संभाजीनगरमध्ये महायुतीत बिघाडी

नाशिक, संभाजीनगरमध्ये महायुतीत बिघाडी

नाशिक व छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली असून महायुतीतील घटकपक्ष आपल्या सोयीनुसार युती करून निवडणुका लढवणार असल्याचे चित्र आहे.
Published on

नाशिक/छत्रपती संभाजीनगर : नाशिक व छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली असून महायुतीतील घटकपक्ष आपल्या सोयीनुसार युती करून निवडणुका लढवणार असल्याचे चित्र आहे.

संभाजीनगरमध्ये भाजपसोबत युती करण्याच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भाजप सकारात्मक प्रतिसाद देत नसेल, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी पर्यायी मार्ग काढतील. शिवसेनेने ४१ जागांचा प्रस्ताव भाजपला दिला होता. मात्र, भाजपसोबत जवळपास ८-९ बैठका झाल्या तरी त्यातून ठोस मार्ग निघालेला नाही, असे शिरसाट यांनी सांगितले.

शिंदे-अजित पवार गट एकत्र लढणार

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. मागील काही दिवस जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर महायुतीत फूट पडली असून, सोमवारी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा होती, परंतु भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे आता आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत आहे. आम्ही महायुतीत लढायचे ठरवले होते. त्यामुळे आमच्यात जागांचा विषय आलेला नव्हता. परंतु, आता आमची (शिंदे गट आणि राष्ट्रवादी) चर्चा सुरू झाली असून, आज रात्रभरात पूर्ण जागांबाबत विचार करून, सामंजस्याने प्रश्न सोडवू आणि निवडणुकीला सामोरे जाऊ.

logo
marathi.freepressjournal.in