महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात! १२०, १०० व ६० ते ७० असा फॉर्म्युला; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांमध्ये ५ तास बैठक

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल, असे संकेत आयोगाने दिले. या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाला वेग आला असून...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दौऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल कधीही वाजेल, असे संकेत आयोगाने दिले. या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाला वेग आला असून, शनिवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात पाच तास मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजप १२०, शिंदेंची शिवसेना १०० व अजित पवारांची राष्ट्रवादी ६० ते ७० जागा लढण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीची शनिवारी रात्री ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. कोण किती जागा लढणार? कोणती जागा कुणाकडे असणार? यावर या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही बैठक झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले मुंबई नाका येथे उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी होती. हा दौरा संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईत आले. त्यानंतर ‘वर्षा’ निवासस्थानी तातडीने बैठक पार पडली.

logo
marathi.freepressjournal.in