२०२९ मध्ये महायुती एकत्रच लढणार! मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, “आमची ताकद वाढली असली तरी महाराष्ट्रात दोन्ही मित्रपक्षांची आम्हाला गरज आहे.
देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस छायाचित्र : X (Devendra Fadanvis)
Published on

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ‘२ डिसेंबरपर्यंत आम्ही थांबलोय’ असे वक्तव्य केल्यामुळे महायुतीचे पुढे काय होणार, याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यातच २०२९पर्यंत महायुती अभेद्य राहील. २०२९ मध्ये भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी अजित पवार हे तिन्ही पक्ष महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत, असे स्पष्ट केले.

एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, “आमची ताकद वाढली असली तरी महाराष्ट्रात दोन्ही मित्रपक्षांची आम्हाला गरज आहे. २०२९ मध्ये आम्ही महायुतीमध्येच विधानसभेची निवडणूक लढणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू, आम्ही आमची ताकद कुठेही कमी होऊ देणार नाही. पण आमची ताकद वाढली म्हणून मित्रपक्षांना सोडून देणार नाही.”

logo
marathi.freepressjournal.in