स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीची वज्रमूठ
संग्रहित छायाचित्र, पीटीआय
Published on

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्र्यांची यादी या कारणावरून सध्या महायुतीतही धुसफूस असली तरी आगामी निवडणुकांसाठी महायुतीने एकत्र येण्याचे ठरवले असून त्याबाबतचे संकेत कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आम्ही आधीच ठरवले होते की २०२५ मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. मला विश्वास आहे, की विधानसभेत ज्याप्रकारे आम्हाला यश मिळाले. त्याचप्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आम्हाला चांगले यश मिळेल.”

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाबद्दल बावनकुळे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी युती केली, तसेच उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या विचारांशी संगनमत केले. मतांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसचे विचार स्वीकारले. उद्धव ठाकरेंच्या परभणी आणि नाशिकमधील रॅलीत पाकिस्तानी ध्वज फडकताना कार्यकर्त्यांनी बघितले. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून त्यामुळे हे पक्ष प्रवेश सुरू आहेत.”

logo
marathi.freepressjournal.in