महायुतीची लोकसभेसाठी मोर्चेबांधणी! वर्षावरील बैठकीत आमदार, खासदारांना सक्त सूचना

मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

मुंबई: राज्यात एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणार, हे गृहित धरुन महायुतीच्या सर्व आमदारांची विशेष बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतली. मतदारसंघनिहाय लोकसभा निवडणुकीत कशा पद्धतीने काम करावे, या विषयी सक्त सूचना देत मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची राष्ट्रीय पातळीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. त्या तयारीतील एक टप्पा म्हणून काल दिल्लीत पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील काही प्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, प्रदेशाध्यक्ष चौधरी भूपेंद्र सिंह, बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी व विजय सिन्हा हे उपस्थित होते.

राज्यवार ओबीसी मतांच्या गणितावर मतदारसंघनिहाय चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महायुतीच्या सर्व खासदार व आमदारांच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे. मराठा आरक्षणावरुन राज्यात बिघडलेले सामाजिक वातावरण व त्याचा लोकसभा निवडणुकीत जिल्हावार होवू शकणारा परिणाम, याविषयी कराव्या लागणाऱ्या कामासंदर्भात तसेच घ्याव्या लागणाऱ्या काळजीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी सक्त सूचना आजच्या बैठकीत दिल्या. महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचेही आवाहन त्यांनी खासदार व आमदारांना केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in