शिंदे यांच्यावर सेनेकडून मोठी कारवाई

बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
शिंदे यांच्यावर सेनेकडून मोठी कारवाई
Published on

एकनाथ शिंदे आणि ठाकरे सरकारच्या प्रतिनिधींची बैठक फिस्कटलेली चित्र समोर दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिंदे यांनी गटनेते पदावरून हकालपट्टी करत त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र याच दरम्यान शिंदे यांनी एक ट्विट करत आपला इरादा स्पष्ट केला आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. असे एकनाथ शिंदे यांचे ट्विट मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे.

शिंदे यांचा प्रस्ताव

-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भाजप सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव

- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हावे

- तरच शिवसेनेमध्ये राहणार

असे प्रस्ताव शिंदेकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in