खड्डेमुक्त रस्ते करा; दुर्लक्ष झाल्यास होणार कारवाई; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा इशारा

राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी खडे मुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी आशा सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिल्या.
खड्डेमुक्त रस्ते करा; दुर्लक्ष झाल्यास होणार कारवाई; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा इशारा
Published on

मुंबई : यंदा वरुणराजाचे आगमन लवकर होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी खड्डे मुक्त रस्ते करण्यावर भर द्यावा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी जिल्हा स्तरावर वॉर रुम स्थापन करण्यात यावे. लोकांसाठी आपत्ती काळात संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्यात यावा. आपल्या अखत्यारीतील सर्व क्षेत्रिय अभियत्यांनी आवश्यक नियोजन करुन सतर्क राहण्याबाबत मुख्य अभियंता यांनी सूचना द्याव्यात व या बाबतीत काळजीपूर्वक कार्यवाही न करणाऱ्या अधिका-यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. पावसाळा पूर्व तयारीचा मंत्री भोसले यांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा घेतला, त्यावेळी मंत्री भोसले बोलत होते.

राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, नागरिकांची गैरसोय होऊ नये या साठी खडे मुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी आशा सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिल्या.

यावेळी या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते सहसचिव रोहिणी भालेकर ,उपसचिव निरंजन तेलंग,संजय देगावकर सचिन चिवटे तसेच दुरदृश्य प्रणालीव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते तसेच जिल्हाचे अधिक्षक अभियंते उपास्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खाजगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी.तसेच मुख्य अभियंता यांनी रस्त्यांवरील माहिती फलकांच्या गॅट्रीजची व पादचारी पुलांची तपासणी करून घ्यावे व खराब झालेल्या गॅट्रीज काढून टाकण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सावधान पुढे धोका, फलक झळकणार!

दरवर्षी पाण्याखाली जाणारे पूल, मो-या या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात येत आहेत. ज्या पुलांची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम चालू आहे त्याठिकाणी असलेले वळण पक्के करणे आदी सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in