मुंबई : २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लांबणीवर पडला आहे. विशेष एनआयए न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी या विस्तृत निकालाचं वाचन अद्याप पूर्ण झालेलं नसल्याने सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली आहे.
न्यायालयाने यापूर्वी गुरुवारी ८ मे ची तारीख निश्चित केली होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व आरोपी न्यायालयात हजर होते.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए न्यायालयात मागील १७ वर्षांपासून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर ९ जून रोजी न्यायालये पुन्हा सुरू झाल्यानंतर तो बदलीचा आदेश लागू होणार होता. मात्र त्याआधीच बॉम्बस्फोटपीडित कुटुंबीयांतर्फे शाहिद नदीम यांनी लाहोटी यांच्या बदलीच्या आदेशावर आक्षेप घेतला होता. न्यायाधीशांच्या बदलीमुळे न्यायदानावर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर काही दिवसांतच गुरुवारी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलनी लाहोटी यांच्या बदलीचा आदेश स्थगिती देत त्यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला. विशेष न्यायालयाने खटल्याचा निकाला आज ८ मे ला निश्चित केला होता. मात्र निकालाचे कामकाज पूर्ण न झाल्याने खटल्याची सुनावणी ३१ जुलैला निश्चित केली.