मोदी व भाजपला धडा शिकवा : मल्लिकार्जुन खर्गे

देशात सध्या लोकशाही व घटना धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे.
मोदी व भाजपला धडा शिकवा : मल्लिकार्जुन खर्गे

नागपूर : देशात सध्या लोकशाही व घटना धोक्यात आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रातील ३२ लाख सरकारी पदे रिक्त असतानाही मोदी सरकार नोकर भरती करत नाही, मागासवर्गीयांना संधी मिळेल म्हणून मोदी सरकार नोकर भरती करत नाहीत. मोदींना जगभर फिरण्यास वेळ आहे, पण अधिवेशन सुरू असताना संसदेत येण्यास वेळ नाही. संसदेत प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांच्या १४६ खासदारांना निलंबित करून कायदे पास करून घेतले ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीला न जुमनणाऱ्या मोदी व भाजपाला धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले.

काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनी नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खर्गे म्हणाले की, ‘‘घटनेने महिला, गरीब, मागास समाजाला अधिकार दिले. आहेत. मात्र, ते भाजप देऊ शकत नाही. काँग्रेस पक्ष हा फुले, शाहु, आंबेडकरांच्या तर मोदी आरएसएसच्या विचारसरणीवर चालतात. मोदी सरकारने देशावर दोनशे लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. पण कल्याणकारी योजनांवरील निधीमध्ये कपात केली जाते, मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली नाही. मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढले आहेत. भाजपला रोखले नाही तर देश बरबाद होईल, घटना संपुष्टात येईल,’’ असेही त्यांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in